विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग
योजनेचे नाव- एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम 100 एकदिवसीय कुक्कुट पिल्ले खरेदी अर्थसहाय्य योजना
| विषय | माहिती | शेरा |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत 100 एक दिवसीय कुक्कुट पिल्ले खरेदी अर्थसहाय्य योजना 50% अनुदानावर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी असून AH-MAHABMS या Android मोबाईल अप्लिकेशन द्वारे https://ah.mahabms.comया संकेतस्थळावरून online पद्धतीने भरावे लागतील. | |
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
सर्वसाधारण व राखीव प्रवर्गातील सर्व पशुपालक व शेतकऱ्यांसाठी सुधारित जातीच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या कोंबड्या तयार करणे व लाभार्थ्याच्या उत्पन्नात वाढ होऊन मुबलक अंडी उत्पादन करून पौष्टीक आहाराची उपलब्धता वाढविणे व पशुपालनामधून पशुपालकांची आर्थिक व सामाजिक पातळी उंचावणे करिता परसातील कुक्कुटपालन व्यवसायात वाढ करणे. | |
| c. योजनेचे निकष.
|
अनिवार्य कागदपत्रे फोटो ओळखपत्राची सत्यप्रत,सातबारा ८ अ उतारा, अपत्य दाखला / स्वघोषणा पत्र, आधारकार्ड ७-१२ मध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र / भाडे करारनामा, लागू असल्यास अनिवार्य जातीच्या दाखल्याची सत्यप्रत – SC/ST साठी रहिवासी प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र बँक खाते पासबुक सत्यप्रत रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र दिव्यांग दाखला बचत गट सदस्य प्रमाणपत्र / पासबुक पहिले पान□ इतर कागदपत्रे वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार कार्यालय नाव नोंदणी सत्यप्रत प्रशिक्षण प्रमाणपत्राची छायांकित प्रतसूचना: प्रत्येक कागदपत्राच्या 2 सत्यप्रती (Attested) व मूळ प्रत पडताळणीसाठी सोबत आणावी. | |
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
योजनेचे अर्ज online पद्धतीनेच स्वीकारले जात असून निवड यादी online पद्धतीने तालुकास्तरावर प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना लेखी निवड पत्र देण्यात येते व दिलेल्या मुदतीत एक दिवसीय 100 कुकुट पिल्ले ,खाद्य,पाण्याची व खाद्याची भांडी, निवारा,ब्रूडर,औषधे इ.ची खरेदी बिले विस्तार कार्यालायात सादर केल्यानंतर DBT नुसार लाभार्थीच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाते. | |
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. | सर्वसाधारण,राखीव असे सर्व प्रवर्गासाठी सदरची योजना असून वय मर्यादा 18-60 वर्षे अशी आहे. | |
| f. योजनेची येशोगाथा.
|
सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तलासरी तालुक्यातील एकूण 13 लाभार्थ्यांना लाभ दिलेला असून सुधारित जातीचे कुक्कुटपक्षी खरेदी करून सर्व लाभार्थी समाधानी आहेत. | |
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | https://ah.mahabms.com |