परिचय
तलासरी तालुका पालघर जिल्हयातील 8 तालुक्यांपैकी बहुतांशी (90.73%) आदिवासी बहुल तालुका आहे.तालुका केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात राज्य यांच्या सिमा भागेवर वसलेला आहे.तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रिय महामार्ग क्रमांक -8 जात आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 26711 हेक्टर आहे. तलासरी तालुक्यात एकुण जिल्हा परिषदेचे 5 निवडणुक विभाग (गट) असुन उपलाट, सुत्रकार, डोंगारी, झाई ,उधवा,गटांचा समावेश आहे.[…]