सामान्य प्रशासन विभाग

विभागप्रमुख

विभाग प्रमुखाचे  नाव – श्रीम. गितांजली रत्नाकर शिंदे 

विभाग प्रमुखाचे पदनाम –  सहाय्यक प्रशासन अधिकारी

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – bdotalasari@gmail.com

पदोन्नती

पंचायत समितीकडे कार्यरत असणार्‍या कनिष्ठ कर्मचार्‍यांना शासनाच्या तरतूदींनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठी पात्र कर्मचार्याची माहिती जिल्हा परिषदकडे सादर करणे

नियतकालीक बदल्या

  • तालुका अंतर्गत शासनाच्या सूचनांप्रमाणे नियतकालिक बदल्या वर्षयातुन एकदाच माहे मे मध्ये केल्या जातात बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ५% विनंती व ५% प्रशासकीय अशा एकूण १०% बदल्या करता येतात. त्यानुसार सेवाजेष्ठता यादी प्रमाणे बदल्यांचे कामकाज पहाणे व इतर विभागांना बदल्याबाबत मार्गदर्शन करणे.

नोंदणी शाखा

तालुका स्तरावरील सर्व टपाल या शाखेकडे नोंदवून संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात येते .

सभांचे कामकाज पंचायत समिती मासिक सर्वसाधारण सभा

पंचायत समिती तलासरी मासिक सर्वसाधारण सभा दर एक महिन्यातून एकदा घेण्याची तरतूद आहे सभेचे अध्यक्ष माननीय सभापती पंचायत समिती तलासरी यांचेकडे असते. या सभेत जिल्हा परिषदेमार्फत व पंचायत समिती मार्फत राबविणेत असलेल्या विविध योजना व विकास कामे, प्रलंबित प्रकरणे इत्यादींचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले जाते. सामान्य प्रशासन विभागाच्या नियोजन संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते.

माहितीचा अधिकार कायदा २००५ अंमलबजावणी

माहितीचा अधिकार कायदा २००५ अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी हा शासकीय माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहतात व अपिलीय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी हे कामकाज पाहतात.