०५ जुलै २०२४ रोजी पंचायत समिती तलासरी येथे निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत ‘संपूर्णता अभियानाचा ‘ शुभारंभ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या प्रसंगी उपसभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात आकांक्षित तालुका कार्यक्रम आणि संपूर्णता अभियानाविषयी माहिती देण्यात आली. अभियानांतर्गत पुढील महिन्यांत सहा प्रमुख निर्देशक साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आरोग्य व कृषी विभागांनी ॲक्शन प्लान सादर केला. यावेळी सर्वांनी अभियान यशस्वी करण्याची शपथ घेतली आणि गावपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात आले.