Primitive Housing Scheme

विभागाचे नाव :- आवास विभाग

योजनेचे नाव – शबरी आवास योजना

Subject Information Remarks

a.   योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

 

  • आदिवासी विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक घरकुल 2012/प्र.क्र.38(भाग-1)का.17 दि. 28 मार्च 2013
  • शहरी व ग्रामीण भागात गृह निर्माण योजना – ग्राम विकास व जलसंधारण विभाग व गृह निर्माण विभागामार्फत
  • अनुसूचित जमातीचे  लाभार्थी यांचा समावेश
  • अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःची घरे नाहीत / कुडा-मातीची घरे
  • आदिवासी उपयोजना अंतर्गत –
    • आदिवासी क्षेत्रातील जिल्ह्यांतील अनुसूचित जमाती लाभार्थी
    • आदिवासी बाह्य क्षेत्रातील पात्र अनुसूचित जमाती लाभार्थी
  • घरकुलाचे क्षेत्रफळ – 269 चौ.फू. चटई क्षेत्र

 

 

b.   योजनेचे उद्दीष्ट.

 

ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे व “सर्वांसाठी घरे” हे उद्दिष्ट साध्य करणे.तालुक्यात 1652 घरकुले मंजूर आहेत.  

c.   योजनेचे निकष.

 

  • लाभार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा.
  • महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक.
  • लाभार्थी बेघर किंवा कच्च्या घरात राहणारा असावा.
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा: ₹१.२० लाख (ग्रामीण क्षेत्रासाठी).
  • स्वतःची किमान २६९ चौ. फूट जागा असावी किंवा विद्यमान कच्च्या घराच्या जागेवर बांधकाम करता येईल.
  • शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ मधील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक.
  • लाभार्थ्याकडे स्वत:चे किंवा कुटूंबीयाचे पक्के घर नसावे
 

d.  योजनेचे कार्यपध्दती.

 

1. लाभार्थी निवड

  • ग्रामसभेत मंजूर झालेल्या यादीतील नाव असणे आवश्यक.

2. आर्थिक सहाय्य

  • मैदानी भागात ₹1.20 लाख
  • घराचे किमान क्षेत्रफळ 269 चौ.फू. चटई क्षेत्र

(स्वयंपाकघरासह).

3. निधी वितरण

  • राज्य शासनाकडून PFMS (DBT) द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हप्त्यांमध्ये निधी जमा.
  • घर बांधणीच्या टप्प्यांनुसार जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करणे बंधनकारक.

4. अभिसरण (Convergence)

  • मनरेगा अंतर्गत 90 दिवसांचे मजुरी सहाय्य.
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी ₹12,000.
 

e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

पात्रता निकष

  • लाभार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असावा.
  • महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक.
  • लाभार्थी बेघर किंवा कच्च्या घरात राहणारा असावा.
  • वार्षिक उत्पन्न मर्यादा: ₹१.२० लाख (ग्रामीण क्षेत्रासाठी).
  • स्वतःची किमान २६९ चौ. फूट जागा असावी किंवा विद्यमान कच्च्या घराच्या जागेवर बांधकाम करता येईल.
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ मिळेल.
  • शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC 2011) मधील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक.
 

f. योजनेची येशोगाथा.

 

 1. पालघर जिल्हा – तलासरी तालुका

  • अनेक आदिवासी कुटुंबे पूर्वी कच्च्या घरात, गळक्या छपराखाली राहत होती.
  • शबरी आवास योजनेतून मिळालेल्या निधीमुळे त्यांनी पक्के घर बांधले.
  • आता त्यांना सुरक्षित निवारा, शौचालय व स्वच्छतेची सुविधा मिळाली आहे.

2. सामाजिक परिणाम

  • महिला सक्षमीकरण: घरकुलाचे मालकी हक्क बहुतेक वेळा महिलांच्या नावावर दिले जातात, ज्यामुळे त्यांचा सामाजिक सन्मान वाढतो.
  • आरोग्य व स्वच्छता: घरकुलासोबत शौचालय, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
  • शिक्षण व रोजगार: सुरक्षित घरामुळे मुलांना शिक्षणासाठी स्थिर वातावरण मिळाले, तर बांधकाम प्रक्रियेत स्थानिकांना रोजगार मिळाला.
  • आदिवासी कुटुंबे: पूर्वी झोपडीसारख्या कच्च्या घरात राहणारी कुटुंबे आता पक्क्या घरात सुरक्षितपणे राहतात.
 
g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक https://pmayg.dord.gov.in