विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- महिलांना साहित्य पुरविणे
| Subject | Information | Remarks |
| योजनेचे विस्तृत माहिती/ स्वरुप. | महिलांना साहित्य पुरविणे | |
| योजनेचे उद्दीष्ट. | .महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ | |
| योजनेचे निकष.
|
निकषानुसार पात्र असलेल्या मुलींच्या निवड यादीस मबाक समितीची मान्यता घेण्यात येईल तदनंतर विभागाने मंजुर केलेल्या वर्णनानुसार लाभार्थ्यांने स्वत: शिवणयंत्र , घरघंटी खरेदी केल्यानंतर प्रकल्पस्तरावर खरेदी केल्याची शहानिशा झाल्यानंतरच पात्र लाभार्थीनीच्या बॅक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल | |
| योजनेचे कार्यपध्दती.
|
1.महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदिल,शिलाई मशीन,पिको फॉल मशीन, पल्वराईझर, छोटे किराणा दुकान, हातगाडी – छप्परसह, झेरॉक्स मशिन इ.
2.ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. 3.प्रती लाभार्थी जास्तीत जास्त रू. 30,,000/ – खर्च करणेत येईल. 4. सदर योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील दारिद्रय रेषेखालील तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- पर्यत असलेल्या कुटुंबातील महिलांना व मुलींना प्राधान्य क्रमाने लाभ देणेंत येईल. तदनंतर सर्वसाधारण लाभार्थीना लाभ देणेंत येईल. 5. लाभार्थी निवड करताना विधवा, निराधार, परितक्त्या यांना प्राधान्य देण्यात येईल. 6. कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देणेत येईल. 7. लाभार्थी अंतीम निवड करण्याचे अधिकार महिला व बालकल्याण समितीस राहील. 8.या योजनेचे लाभ नियोजन विभागाचे शासन निर्णय क्र.डीसीटी/2316/प्र.क्र. 133/का.1417 दि.5 डिसेंबर 2016 अन्वये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरुपाने मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मध्ये ज्या वस्तुचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार या विभागाने मंजूर केलेल्या वर्णनानुसार लाभार्थीनींने स्वत: वस्तू खरेदी केल्याची शहानिशा प्रकल्पस्तरावर करण्यात येईल. सदर तरतुदीमधून पात्र लाभार्थीनीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये योजनेंतर्गत येणाऱ्या वस्तूची रोख रक्कम गट विकास अधिकारी यांचेमार्फत जमा करण्यात येईल. तसेच उक्त शासन निर्णयातील परिशष्ट – अ मध्ये (DBT) समाविष्ठ नसलेल्या वस्तू विहित पद्धतीने खरेदी करुन पात्र अर्जदार लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. 9. सदर योजना DBT मध्ये समाविष्ट आहे. लाभार्थ्यास आवश्यकतेनुसार पाहिजे ती वस्तू खरेदी करण्याचे स्वातंत्र्य राहील तथापि देय होणारे अर्थसहाय्य हे वस्तू खरेदीची प्रत्यक्ष किमतीच्या 90% रक्कम अथवा रु.20,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढेच अर्थसहाय्य अनुज्ञेय असेल व याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी, यांनी करुनच अर्थसहाय्य वितरीत करावे. |
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
1)लाभार्थी महिला दारिद्रय रेषेखालील असणे आवश्यक आहे.
2. सन 2025-26 चा वार्षिक उत्पन्नाचा दाखला / दारिद्रय रेषेचा दाखला, चालु आर्थिक वर्षाचे विद्युत देयक/ आधार कार्ड/ रेशनकार्ड /बँक खातेपुस्तिका, /शिलाई मशिन प्रमाणपत्र इतर विभागातुन लाभ घेतला नसल्याचे प्रमाणत्र जोडणे आवश्यक |
|
| योजनेची येशोगाथा. | ||
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |