विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग
योजनेचे नाव- सर्वसाधारण महिला पशुपालकांना दुधाळ जनावर खरेदी अर्थसहाय्य योजना
| Subject | Information | Remarks |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
जिल्हा परिषद उपकर योजना सर्वसधारण महिला पशुपालकांना दुधाळ जनावर गाय/म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे या योजनेंतर्गत महिला पशुपालकांना एक दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदी करणे करिता 50% अनुदान देणेत येते.करिता प्रति लाभार्थी जनावराच्या खरेदी किमतीच्या कमाल 50टक्के म्हणजे गाय जनावरासाठी कमाल रु.35000/- व म्हैस जनावरासाठी रु.40000/-पर्यंत अनुदान देय राहील. सदरील योजनेचे अर्ज पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात माहे मे ते जुन या कालावधीत उपलब्ध राहतील. | |
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
महिला पशुपालकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.महिला पशुपालकांची पशुपालनामधून आर्थिक व सामाजिक पातळी उंचावणे. | |
| c. योजनेचे निकष.
|
अ) अर्जदार महिला पशुपालक असावी. ब) अर्जदाराने स्वःखर्चाने सुधारित जातीच्या म्हैशीचा/ गायीचा ३ वर्षांचा विमा उतरविणे बंधनकारक राहील. क) अर्जदार अथवा त्याचा वैवाहिक जोडीदार शासकीय, निम शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत नसावा वा निवृत्त झालेला नसावा. ड) अर्जदाराकडे जनावरासाठी निवारा, पाणी व खाद्य याची सोय असल्याचा ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचा दाखला सादर करावा लागेल. इ) संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयानुसार दुधाळ जनावरांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एका सुधारित जातीच्या म्हैशी करीता खरेदी किंमतीच्या ५० टक्के अथवा रु. ४०,०००/- व देशी किंवा संकरीत गायी करिता किंमतीच्या ५० टक्के अथवा रु. ३५,०००/- या पैकी कमीत कमी असेल इतके अनुदान देण्यात येईल. ई) पशुपालकाने विहित नमुन्यात परिपुर्ण भरलेला अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. | |
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
गट स्तरावरून अर्ज मागवून पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती, जि.प. पालघर स्तरावर उपरोक्त अटी व शर्तींना अधीन राहून तालुका निहाय महिला लाभार्थींची निवड करण्यात येईल व अनुदानाची रक्कम गटस्तरावर वर्ग करण्यात येईल. लाभार्थीने खरेदी केलेल्या म्हैशीची पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती व स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याचा संस्था प्रमुख यांनी शहानिशा केल्या नंतर व जनावराचा विमा उतरविल्या नंतर लाभार्थीच्या आधार लिंक बँक बचत खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येईल. | |
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. | सर्वसाधारण महिला असे सर्व प्रवर्गासाठी सदरची योजना लागू असून वय मर्यादा 18-60 वर्षे अशी आहे. | |
| f. योजनेची येशोगाथा.
|
सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तलासरी तालुक्यातील एकूण 05 लाभार्थ्यांना लाभ दिलेला असून चार महिला लाभार्थ्यांनी दुधाळ गाय व एका लाभार्थ्याने दुधाळ म्हैस खरेदी केली असून सर्व लाभार्थी समाधानी आहेत. | |
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक
|
सदर योजनेचे अर्ज offline पद्धतीने स्वीकारले जातात.अर्जाची प्रत पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात उपलब्ध आहे (कालावधी माहे मे ते जुन) |