मातृत्व अनुदान

Department name : आरोग्य विभाग

Scheme name : मातृत्व अनुदान

Subject                 Information Remarks
 

योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप

 

Maternity Grant Scheme ही प्रामुख्याने गर्भवती महिलांना आर्थिक मदत देऊन सुरक्षित प्रसूती, माता-बाल आरोग्य सुधारणा आणि पोषण वाढविण्यासाठी राबवली जाते.
 

योजनेचे उद्दीष्ट

 

१ . गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे

२.संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन

३. माता व बालकाचा मृत्यू दर कमी करणे

४. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांचे पोषण व आरोग्य सुधारणे

 

योजनेचे निकष

 

१. अनुसूचित जमाती (ST) मधील गर्भवती महिला

२. नवसंजीवनी योजनेतील गावातील महिला

३. दोन जिवंत अपत्य असताना तिसऱ्या वेळी गर्भवती महिला

 

 

 

 

योजनेचे कार्यपध्दती.

 

१. जवळच्या:

  • प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)
  • Substation
  • अंगणवाडी केंद्र

२.  ASHA / ANM / आरोग्य सेविका मार्फत अर्ज

३.  ऑनलाइन अर्ज (PMMVY पोर्टल)

४.  Direct Benefit Transfer (DBT) द्वारे पैसे खात्यात जमा

५.  आरोग्य तपासणी, लसीकरणाशी जोडलेले अनुदान

६.  अंगणवाडी/ASHA/ANM मार्फत अंमलबजावणी

७. आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभाग संयुक्तरीत्या राबवतात

 

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

१.  गर्भधारणा नोंदणी (Early Registration)

२.  किमान एक ANC (Ante-Natal Checkup)

३.  संस्थात्मक प्रसूती (Hospital delivery)

४. बालकाचे लसीकरण पूर्ण करणे

५. आधार लिंक बँक खाते

 

 

योजनेची येशोगाथा.

 

विभा रायवार (एक लाभार्थी): विभा यांची आर्थिक स्थिती बेताची होती. गरोदरपणात औषधांचा खर्च कसा करायचा याची त्यांना चिंता होती. अंगणवाडी सेविकेमार्फत त्यांना या योजनेची माहिती मिळाली. त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांनी वेळेवर तपासण्या केल्या आणि योग्य आहार घेतला. आज त्यांचे बाळ सुदृढ असून त्या सरकारचे आभार मानतात.
 

संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक