अमृत आहार योजना – आदिवासी भागासाठी विशेष तरतुदी
उद्दिष्ट :
आदिवासी व दुर्गम भागातील गर्भवती व स्तनदा माता तसेच लहान मुलांमधील कुपोषण कमी करणे
पौष्टिक, घरगुती स्वरूपातील आहार देऊन आरोग्य सुधारणा व शारीरिक विकास साधणे.
विशेष तरतुदी :
आदिवासी जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीद्वारे रोज शिजवलेला गरम आहार पुरवला जातो.गर्भवती व स्तनदा माता यांना प्रत्यक्ष भोजन (पोळी-भाजी, खिचडी, लापशी, शिरा इ.) दिले जाते.६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक आहार (अन्नधान्य + प्रथिनेयुक्त पदार्थ) मिळतो.
जेवणासाठी आवश्यक धान्य, कडधान्ये, तेल, साखर, मसाले जिल्हा परिषद/स्थानिक मंडळांमार्फत उपलब्ध केले जातात.या योजनेमुळे आदिवासी भागातील कुपोषण, रक्ताल्पता व बालमृत्यू दर कमी होणे हे उद्दिष्ट साध्य केले जाते.