सर्वसाधारण महिला पशुपालकांना दुधाळ जनावर खरेदी अर्थसहाय्य योजना

विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग

योजनेचे नाव- सर्वसाधारण महिला पशुपालकांना दुधाळ जनावर खरेदी अर्थसहाय्य योजना

Subject Information Remarks
a.   योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

जिल्हा परिषद उपकर योजना सर्वसधारण महिला पशुपालकांना दुधाळ जनावर गाय/म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे या योजनेंतर्गत महिला पशुपालकांना एक दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदी करणे करिता 50% अनुदान देणेत येते.करिता प्रति लाभार्थी जनावराच्या खरेदी किमतीच्या कमाल 50टक्के म्हणजे गाय जनावरासाठी कमाल रु.35000/- व म्हैस जनावरासाठी रु.40000/-पर्यंत अनुदान देय राहील. सदरील योजनेचे अर्ज पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात माहे मे ते जुन या कालावधीत उपलब्ध राहतील.
b.     योजनेचे उद्दीष्ट.

 

महिला पशुपालकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे.महिला पशुपालकांची पशुपालनामधून आर्थिक व सामाजिक पातळी उंचावणे.
c.   योजनेचे निकष.

 

अ) अर्जदार महिला पशुपालक असावी. ब) अर्जदाराने स्वःखर्चाने सुधारित जातीच्या म्हैशीचा/ गायीचा ३ वर्षांचा विमा उतरविणे बंधनकारक राहील. क) अर्जदार अथवा त्याचा वैवाहिक जोडीदार शासकीय, निम शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत नसावा वा निवृत्त झालेला नसावा. ड) अर्जदाराकडे जनावरासाठी निवारा, पाणी व खाद्य याची सोय असल्याचा ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचा दाखला सादर करावा लागेल. इ) संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयानुसार दुधाळ जनावरांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे एका सुधारित जातीच्या म्हैशी करीता खरेदी किंमतीच्या ५० टक्के अथवा रु. ४०,०००/- व देशी किंवा संकरीत गायी करिता किंमतीच्या ५० टक्के अथवा रु. ३५,०००/- या पैकी कमीत कमी असेल इतके अनुदान देण्यात येईल. ई) पशुपालकाने विहित नमुन्यात परिपुर्ण भरलेला अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.
d.  योजनेचे कार्यपध्दती.

 

गट स्तरावरून अर्ज मागवून पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती, जि.प. पालघर स्तरावर उपरोक्त अटी व शर्तींना अधीन राहून तालुका निहाय महिला लाभार्थींची निवड करण्यात येईल व अनुदानाची रक्कम गटस्तरावर वर्ग करण्यात येईल. लाभार्थीने खरेदी केलेल्या म्हैशीची पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती व स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याचा संस्था प्रमुख यांनी शहानिशा केल्या नंतर व जनावराचा विमा उतरविल्या नंतर लाभार्थीच्या आधार लिंक बँक बचत खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. सर्वसाधारण महिला असे सर्व प्रवर्गासाठी सदरची योजना लागू असून वय मर्यादा 18-60 वर्षे अशी आहे.
f. योजनेची येशोगाथा.

 

सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तलासरी तालुक्यातील एकूण 05 लाभार्थ्यांना लाभ दिलेला असून चार महिला लाभार्थ्यांनी दुधाळ गाय व एका लाभार्थ्याने दुधाळ म्हैस खरेदी केली असून सर्व लाभार्थी समाधानी आहेत.
g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक

 

सदर योजनेचे अर्ज offline पद्धतीने स्वीकारले जातात.अर्जाची प्रत पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात उपलब्ध आहे (कालावधी माहे मे ते जुन)