महिलांना कायदे व विधीविषयक सल्ला देणे

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- महिलांना कायदे व विधीविषयक सल्ला देणे

 

Subject Information Remarks
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. महिलांना कायदे व विधीविषयक सल्ला देणे
योजनेचे उद्दीष्ट. प्रशिक्षण देणे.
योजनेचे निकष.
योजनेचे कार्यपध्दती.

 

1.महिलांना व मुलींना कायदेशीर प्रशिक्षण देणेसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील.

2.शिबिरासाठी 2 प्रशिक्षक नियुक्त करावेत. त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, विधी तज्ञ, अनुभवी व संवेदनशील तज्ञ  मार्गदर्शक यांचेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल, प्रती प्रशिक्षकास मानधन रु.500/- प्रमाणे देय राहील.

3. सदर योजना राबविणेसाठी तालुकास्तरीय मोफत कायदेविषयक सल्लागार समिती किंवा विधी सेवा समिती यांचे मार्गदर्शन घेणेत येईल.

4. महिलांना कायदेविषयक प्रशिक्षण देणेसाठी आयोजित शिबीरासाठी रु.5000/- पर्यंत  खर्च करण्यात येईल.

5. मानधना व्यतिरिक्त निधीमध्ये उपस्थितांसाठी नाश्ता, चहा इत्यादी बाबींवर खर्च करता  येईल.

6. तरतूद गट विकास अधिकारी यांचेमार्फत प्रकल्प कार्यालयांना वितरीत करण्यात येईल.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही