प्रशिक्षण शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- प्रशिक्षण शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल

Subject Information Remarks
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. प्रशिक्षण शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल  
योजनेचे उद्दीष्ट.
योजनेचे निकष. निकषानुसार पात्र असलेल्या मुलींच्या निवड यादीस मबाक समितीची मान्यता घेण्यात येते
योजनेचे कार्यपध्दती.

 

1) ग्रामीण व दुर्गम भागातील शाळेपासून जास्त अंतरावरील तथापी शाळा ते घराचे अंतर कमीत कमी 2 कि.मी. असणाऱ्या मुलींना प्रथम लाभ देता येईल.

2) इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सदरचा लाभ देय असून एकाच कुटुंबातील तथापि भिन्न ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलीच्या बाबतीत एका कुटुंबात जास्तीत जास्त 2 लाभार्थ्यांना लाभ देता येईल.

3) शिक्षणासाठी रेल्वे / बसने परगावी जाणा-या विद्यार्थिनींसाठी रेल्वे स्थानक / बसस्थानक ते घर यामधील अंतर कमीत कमी 2 कि.मी. असल्यास व  इतर अटी पूर्ण होत असल्यास योजना लाभ देय राहील.

4) क्र.1 व 3 प्रमाणे लाभार्थी संपल्यानंतर 1 कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थींनींना लाभ देता येईल.

5) सर्वसाधारण लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल परंतू लाभ देतांना  अपंग व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थीनींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.

6) सदरची योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) तत्वावर राबविण्यात येईल.

7)लाभार्थ्यांचे अर्ज बाविप्रअ/गविअ/मा.सभापती पं.स.यांचे शिफारशीनुसार स्विकारले जातील.

8) लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहतील.

9) सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा अन्य विभागाकडुन लाभ घेतला नसल्याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी करतील.

10) दोन चाकी सायकलचा लाभ नियोजन विभागाचे शासन निर्णय क्र.डीसीटी/2316/प्र.क्र. 133/का.1417 दि.5 डिसेंबर 2016 अन्वये विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरुपाने मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मध्ये सायकल या वस्तुचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार या विभागाने मंजूर केलेल्या वर्णनानुसार लाभार्थीनींने स्वत: सायकल खरेदी केल्याची शहानिशा प्रकल्पस्तरावर करण्यात येईल. सदर तरतुदीमधून पात्र लाभार्थीनीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सायकल या वस्तूची रोख रक्कम गट विकास अधिकारी यांचेमार्फत जमा करण्यात येईल.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

1) लाभार्थी मुली या इ. 5 वी ते 12 वी इयत्तेमध्ये शिकणा-या मुली

2) शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर 2 कि.मी. असणे आवश्यक आहे.

3) दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल दाखला आवश्यक .

4. लाभाथी विद्यार्थिनींनी आधारकार्ड,बँकखाते पुस्तिका तसेच वयाचा दाखला  असणे आवश्यक

योजनेची येशोगाथा.
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही