जिल्हा परिषद उपकर योजना दिव्यांग पशुपालक शेतकऱ्यांना 90%अनुदानावर  दुभत्या जनावर खरेदी अर्थसहाय्य / शेळी गट(10+1) खरेदी अर्थसहाय्य योजना 

विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग

योजनेचे नाव- जिल्हा परिषद उपकर योजना दिव्यांग पशुपालक शेतकऱ्यांना 90%अनुदानावर  दुभत्या जनावर खरेदी अर्थसहाय्य / शेळी गट(10+1) खरेदी अर्थसहाय्य योजना

 

Subject Information Remarks
a.   योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

जिल्हा परिषद उपकर योजना दिव्यांग पशुपालकांना 90% अनुदानावर दोन दुभत्या जनावर खरेदी / शेळी गट (10+1)खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे या योजनेंतर्गत दिव्यांग पशुपालकांना दोन दुभत्या जनावरांचा खरेदी करणे/शेळी गट खरेदी करणे करिता 90% अनुदान देणेत येते.दुभत्या जनारांचे खरेदी अनुदान रु.144000/-पर्यंत व शेळी गटखरेदी अनुदान रु.61200/-इतके अनुदान देय राहील. सदरील योजनेचे अर्ज पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात माहे मे ते जुन या कालावधीत उपलब्ध राहतील.
b.     योजनेचे उद्दीष्ट.

 

दिव्यांग पशुपालकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे. दिव्यांग पशुपालकांची पशुपालनामधून आर्थिक व सामाजिक पातळी उंचावणे.
c.   योजनेचे निकष.

 

आधार कार्ड,दिव्यांग प्रमाणपत्र(40% पेक्षा जास्त),रहिवासी दाखला जातीचा दाखला (लागू असल्यास) बँक पासबुक, रेशन कार्ड / कुटुंब प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचा निवारा-पाणी-खाद्य दाखला, अपत्य दाखला / स्वघोषणापत्र, 7/12 व 8अ उतारा, पासपोर्ट साईज फोटो – 2, सरकारी नोकरीत नसल्याचे स्वघोषणापत्र
d.  योजनेचे कार्यपध्दती.

 

गट स्तरावरून अर्ज मागवून पशुसंवर्धन व दुग्धशाळा विषय समिती, जि.प. पालघर स्तरावर उपरोक्त अटी व शर्तींना अधीन राहून तालुका निहाय दिव्यांग लाभार्थींची निवड करण्यात येईल व अनुदानाची रक्कम गटस्तरावर वर्ग करण्यात येईल. लाभार्थीने खरेदी केलेल्या दुभत्या जनावरांची/ शेळी गटाची पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती व स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याचा संस्था प्रमुख यांनी शहानिशा केल्या नंतर व जनावराचा विमा उतरविल्या नंतर लाभार्थीच्या आधार लिंक बँक बचत खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. दिव्यांग प्रमाणपत्र (40% पेक्षा जास्त) प्रवर्गासाठी सदरची योजना लागू असून वय मर्यादा 18-60 वर्षे अशी आहे.
f. योजनेची येशोगाथा.

 

सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तलासरी तालुक्यातील शेळी गट एकूण 01 लाभार्थ्यांना लाभ दिलेला असून लाभार्थ्यांनी शेळी गट खरेदी केली असून लाभार्थी समाधानी आहेत.
g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक

 

 

सदर योजनेचे अर्ज offline पद्धतीने स्वीकारले जातात.अर्जाची प्रत पशुवैद्यकीय दवाखाने व पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात उपलब्ध आहे (कालावधी माहे मे ते जुन)