विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे
| Subject | Information | Remarks |
| योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. | सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे
|
|
| योजनेचे उद्दीष्ट. | प्रशिक्षण देणे. | |
| योजनेचे निकष. | निकषानुसार पात्र मुली च्या बॅक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते | |
| योजनेचे कार्यपध्दती.
|
1. सदर योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांतील दारिद्रय रेषेखालील तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- पर्यंत असलेल्या कुटुंबातील मुलींना प्राधान्याने देणेत येईल व निधी उपलब्धतेनुसार इतर लाभार्थ्यांना देण्यात येईल.
2.इ.7 वी ते इ.12 वी पास मुलींना MS-CIT संगणक प्रशिक्षण देणेत येईल. 3. प्रशिक्षण घेण्यासाठी लाभार्थींना दोन पर्याय उपलब्ध रहातील. i) मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रशिक्षण घेतले असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करणे. ii) प्रशिक्षणासंदर्भात संस्था नेमण्यात आल्यास सदर संस्थेमार्फत प्रशिक्षण घेणे. 4. 1 जानेवारी 2025 ते फ़ेब्रु 2026 या कालावधीत संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या मुलींना लाभ देण्यात येईल. 5. संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार संगणक प्रशिक्षणाचे शुल्क थेट लाभ हस्तांतरण (DBT) नुसार आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल. 6. लाभार्थींचे अर्ज बाविप्रअ/गविअ/मा.सभापती पं.स. यांचे शिफारशीनुसार स्विकारले जातील. 7. लाभार्थींची अंतिम निवड करण्याचे अधिकार महिला व बाल कल्याण समितीस राहतील. 8. इच्छुक संस्थांसोबत करार करुन योजना राबविता येईल व प्रशिक्षणाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. 9. सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा अन्य विभागाकडून लाभ घेतला नसल्याची खात्री बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी करावी. 10. सन 2024-25 या आर्थिक वर्षामधील ज्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देता आला नाही त्यांना लाभ देय राहील.
|
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
विहित नमुन्यातील परिपुर्ण अर्ज शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्राची सत्यप्रत / फी भरल्याची पावती, /आधारकार्ड,/ दारिद्र रेषेचा /बॅक खातेपुस्तिीकेच्या प्रथम पानाची सत्यप्रत | |
| योजनेची येशोगाथा. | प्रशिक्षण | |
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |