पशुसंवर्धन विभाग

विभागप्रमुख 

 

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. भूषण मयेकर 

विभाग प्रमुखाचे पदनाम –  पशुसंवर्धन अधिकारी

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल - ldoext.talasari@gmail.com

परिचय

पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक लसिकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्ध व्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसंवर्धन विभागाच्या  विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयांची माहिती व प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना जनावरांची जोपासना चांगली करण्याबाबत माहिती देणे ही या विभागा मार्फत केले जाते. शासनाच्या पशुसंवर्धनच्या संबंधित विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, सर्वसाधारण, दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिला जातो. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. पालघर ही या विभागाचे प्रमुख असून निरनिराळ्या योजनेची अंमलबजावणी अधिकारी असतात, तसेच ते केंद्रस्तर व राज्यस्तर व जिल्हा परिषद उपक्रमामधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करतात.

महत्वाचे कार्य :

1)     जि. प. राज्य शासन, केंद्र शासनातर्फे आयोजित योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे.

2)     जनावरांसाठी रोग प्रतिबंधक व रोग नियंत्रणासाठी कार्यक्रम राबविणे. तसेच पशुवैद्यकीय सेवा पुरवणे.

3)     ग्रामीण भागात पशुपालनातून रोजगार निर्मिती करणे.

4)   कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन तसेच विकास योजना राबविणे.

5)    पशुपालन, पशुसंवर्धन इ. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

 

पशुवैद्यकीय दवाखाने श्रे-1 व श्रे-2 यांच्या द्वारे विविध प्रकारची कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, खच्चीकरण, गर्भतपासणी, वंध्यत्व  तपासणी, संकरीत वासरांची पैदास, नमुने तपासणी, शस्त्रक्रिया इत्यादी स्वरूपाची तांत्रिक कामकाज व शासकीय योजना राबविण्याचे कामकाज केले जाते. गट पातळीवर पशुधन विकास अधिकारी (वि) हे समन्वय अधिकारी म्हणून शासनस्तर व जिल्हा परिषद स्तरावरील निरनिराळ्या योजना राबविण्याचे दृष्टीने पंचायत समिती , त्या अंतर्गत असणारे दवाखान्या द्वारे गटविकास अधिकारी यांच्या वतीने योजना राबवतात.

पशुवैदयकीय दवाखाने :- 06

श्रेणी – 1 चे दवाखाने – 03 पशुवैदयकिय दवाखाना तलासरी . पशुवैदयकीय दवाखाना वेवजी.

फिरता पशुवैदयकिय दवाखाना.

 

03
श्रेणी – 2 चे दवाखाने – 03 पशुवैदयकीय दवाखाना उधवा.

पशुवैदयकीय दवाखाना गिरगांव.

पशुवैदयकीय दवाखाना उपलाट.

 

03

पशु विभागाच्या योजना :- 2024 – 25

अ.क्र. बाब लक्षांक मासिक प्रगतीपर टक्केवारी
  अ – गाय वर्ग 0 18 222 0
  ब – म्हैस वर्ग 0 4 57 0
1 कृत्रिम रेतन जनावरे 1200 22 279 23
2 कृत्रिम रेतन 1097 124 1270 116
3 खच्चीकरण 600 38 472 79
4 उपचार 31500 312 2984 9
5 शस्रक्रिया 795 08 87 11
6 गर्भतपासणी 3000 190 1318 44
7 वंधत्व तपासणी 900 43 583 65
8 सेवा शुल्क 270000 44860 207270 77
9 कार्यमाहिम 90 0 06 07
10 वंधत्व निवारण शिबिर 82 0 34 41
11 लसीकरण 98950 0 133000 134