पंचायत समिती तलासरी
तलासरी तालुका पालघर जिल्हयातील 8 तालुक्यांपैकी बहुतांशी (90.73%) आदिवासी बहुल तालुका आहे.तालुका केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली व गुजरात राज्य यांच्या सिमा भागेवर वसलेला आहे.तालुक्याच्या मध्य भागातुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रिय महामार्ग क्रमांक -8 जात आहे.तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 26711 हेक्टर आहे. तलासरी तालुक्यात एकुण जिल्हा परिषदेचे 5 निवडणुक विभाग (गट) असुन उपलाट, सुत्रकार, डोंगारी, झाई ,उधवा,गटांचा समावेश आहे.पंचायत समितीचे 10 निर्वाचण गण असुन उधवा ,उपलाट, कोचाई, सुत्रकार, झरी ,डोंगारी ,गिरगाव ,झाई ,वसा व ,वडवली,गणांचा समावेश आहे. तालुक्यात 21 ग्रामपंचायती व 41 महसुल गावे असुन 214 पाडे आहेत तालुक्याचे 2011 च्या जनगणनेनुसार एकुण 1,54,818 लोकसंख्या आहे.त्यापैकी 76417 पुरूष व 78401 स्रियांची संख्या आहे..स्रियांचे प्रमाण ( 50.24) पुरूषांपेक्षा (49.76) जास्त आहे. 16304 कुटूंबे दारिद्रय रेषेखालील आहे. तालुक्यामध्ये वारली ,धोडिया ,कोकणा ,कातकरी ,जमाती प्रामुख्याने आढळुन येते .यामध्ये वारली समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.या तलासरी तालुक्यात धोडिया वारली कोकणी भाषा बोलली जाते.यामध्ये उपलाट गटामध्ये डावर, वारली , झाई गटामध्ये कोकणी, धोडिया,भाषा प्रामुख्याने बोलली जाते.वारली कलाचित्र हे तालुक्यात लोकप्रिय व प्रचलीत आहे. तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे.प्रामुख्याने भात हे मुख्य पीक असुन हे पीक पावसावर अवलंबुन आहे.येथे पावसाचे सरासरी प्रमाण 28.99 मिली मिटर आहे.तसेच प्रामुख्याने शिंदीच्या झाडांची मोठया प्रमाणात शेतांवर लागवड झालेली आहे.तलासरी तालुक्यातील शेती व्यतीरिक्त रोजगारासाठी बहुतांशी लोक महाराष्ट्र औदयोगिक विकास वसाहत-अच्छाड व गुजरात औदयोगिक विकास वसाहत उंबरगाव तसेच पुर्वेस सिमा लगत असलेला केंद्र शासीत प्रदेश दादरा नगर हवेली येथे जातात.तलासरी तालुक्याच्या ठिकाणी शासकिय कार्यालय सेवाभावी संस्था शैक्षणिक संस्था बँक पोस्ट इत्यादी सोयी सुविधा आहेत. एकुण पाहता तलासरी तालुक्यामध्ये गरीबातील गरीबापर्यंत पोहोचुन त्यांचा विकास करण्याची मोठी संधी या ठिकाणी आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियाना (उमेद) मार्फत गरीब लोकांच्या संस्था तयार करून क्षमता बांधणी करणे आणी त्या माध्यमातुन शाश्वत रोजगार उपजिविका निर्माण करून त्यांचा विकास साधणे हे ध्येय डोळयासमोर ठेवुन वाटचाल करीत आहेत.