अमृत आहार योजना – आदिवासी भागासाठी विशेष तरतुदी उद्दिष्ट

अमृत आहार योजना – आदिवासी भागासाठी विशेष तरतुदी

उद्दिष्ट :

           आदिवासी व दुर्गम भागातील गर्भवती व स्तनदा माता तसेच लहान मुलांमधील कुपोषण कमी                  करणे              

पौष्टिक, घरगुती स्वरूपातील आहार देऊन आरोग्य सुधारणा व शारीरिक विकास साधणे.

           विशेष तरतुदी :

आदिवासी जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीद्वारे रोज शिजवलेला गरम आहार पुरवला जातो.गर्भवती व स्तनदा माता यांना प्रत्यक्ष भोजन (पोळी-भाजी, खिचडी, लापशी, शिरा इ.) दिले जाते.६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूरक आहार (अन्नधान्य + प्रथिनेयुक्त पदार्थ) मिळतो.

जेवणासाठी आवश्यक धान्य, कडधान्ये, तेल, साखर, मसाले जिल्हा परिषद/स्थानिक मंडळांमार्फत उपलब्ध केले जातात.या योजनेमुळे आदिवासी भागातील कुपोषण, रक्ताल्पता व बालमृत्यू दर कमी होणे हे उद्दिष्ट साध्य केले जाते.