नैसर्गिक/रहस्यमय सौंदर्य

कुर्झे धरण

तलासरी तालुक्यात वरोली नदीवर कुर्झे धरण असुन धरणाची उंची २२.९६ मीटर (७५.३ फूट) तर लांबी २,५०७.७६ मीटर (८,२२७.६ फूट) आहे. त्याचे आकारमान ८४६.१२  किमी  (२०२.९९ घन मैल) आहे आणि एकूण साठवण क्षमता ३९,०५०.०० किमी  (९,३६८.५९ घन मैल) आहे.,कुर्झे धरणात मोकळ्या जागेत तसेच पाणथळ परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्ष्यांची गर्दी वाढते. यामध्ये लहान करकोचे, लहान, मध्यम व मोठे बगळे, वंचक, सूरय, तुतारी, देशी तुतारी, वटवट्या, सोंकपाल, कापसी, राखी, जांभळे बगळे, पाणडुबी, काळ्या डोक्याचा शाराटी, टिटवी व पाणकोंबड्या आदी छोट्या-मोठ्या आकाराचे पक्षी मुक्त विहार करताना नजरेस पडतात. याशिवाय भारतातील विविध भागांतील पक्षीही येथे स्थलांतर करून आल्याचे दिसून येत आहे. अडई-लेसर व्हसलिंग डक, धनवर (हळदीकुंकू बदक), स्पॉट बिल्ट डक, काणूक- कॉटन पिग्मी गुज इत्यादी विविधरंगी रानबदके या हंगामात आढळून येत असतात.

झाई बीच

झाई बीच समुद्रकिनारा उंच नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे आणि पांढर्‍या वालुकामय समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला आहे. समुद्रकिनारा देखील मासेमारीसाठी एक लोकप्रिय गंतव्यस्थान आहे आणि अनेक मासेमारी गावांनी वेढलेला आहे. अभ्यागत मच्छिमारांना त्यांच्या दैनंदिन वस्तू आणताना आणि स्थानिक बाजारातून ताजे सीफूड खरेदी करताना पाहू शकतात.

बल्लाळगड

बल्लाळगड हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील एक डोंगरी किल्ला आहे. काजळी गावातील छोट्याश्या टेकडीवर बल्लाळगड हा टेहळणीचा किल्ला होता. बल्लाळगडाच्या माथ्याच्या अलीकडे एका झाडाखाली एक वीरगळ ठेवलेला आहे.  वीरगळ पाहून बलाळगडाच्या माथ्याकडे चालत गेल्यास चार बुरुजांनी व तटबंदीने संरक्षित केलेला बल्लाळगडाचा माथा लागतो. त्यावरच्या ४ बुरुजांचे आणि तटबंदीचे अवशेष आज २१व्या शतकातही पाहायला मिळतात. तटबंदी १५ फ़ूट उंच असून ५ फ़ूट रुंद आहे. प्रचंड मोठे दगड वापरून ती तटबंदी बनवलेली आहे. तटबंदीमधे शौचकूप बनवलेले पाहायला मिळतात. तटबंदीच्या आत दोन मोठे हौद आहेत.