विभागाचे नाव :- आवास विभाग
योजनेचे नाव – मोदी आवास योजना
| विषय |
माहिती |
शेरा |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
मोदी आवास योजना (पत्र दि.28 जुलै 2023)
- इतर मागास बहूजन कल्याण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक -वगृयो-2023/प्र.क्र.33/योजना-5 दि.28 जुलै 2023
- लाभार्थी निवड निकष:
- Awaas Plus प्रतिक्षा यादीतील लाभार्थी
- Awaas Plus प्रणालीवर नोंद झालेले पण automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी
- जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी
- योजनेचे स्वरूप:
-
- पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी ₹1.20 लाख अर्थसहाय्य
- घरकुलाचे किमान क्षेत्रफळ – 269 चौ.फुट
-
- लाभार्थी निवड वरील 1 ते 3 मधील यादीतून
- ग्रामसभेमार्फत प्राधान्यक्रमानुसार निवड
- स्थळ पाहणी न झालेल्या लाभार्थ्यांची पाहणी करणे
- ग्रामसभेतील निवड → तालुका स्तरावर गट विकास अधिकारी छाननी → जिल्हा स्तरावर मान्यता
|
|
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून देणे व “सर्वांसाठी घरे” हे उद्दिष्ट साध्य करणे. |
|
| c. योजनेचे निकष.
|
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
- महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक.
- लाभार्थी बेघर किंवा कच्च्या घरात राहणारा असावा.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: ₹१.२० लाख (ग्रामीण क्षेत्रासाठी).
- स्वतःची किमान २६९ चौ. फूट जागा असावी किंवा विद्यमान कच्च्या घराच्या जागेवर बांधकाम करता येईल.
- शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्याकडे स्वत:चे किंवा कुटूंबीयाचे पक्के घर नसावे
- लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत करण्यात येईल.
- लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL)मध्ये समाविष्ट नसावा.
|
|
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
1. लाभार्थी निवड
- ग्रामसभेत मंजूर झालेल्या यादीतील नाव असणे आवश्यक.
2. आर्थिक सहाय्य
- घराचे किमान क्षेत्रफळ 269 चौ.फू. चटई क्षेत्र
(स्वयंपाकघरासह).
3. निधी वितरण
- राज्य शासनाकडून PFMS (DBT) द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात हप्त्यांमध्ये निधी जमा.
- घर बांधणीच्या टप्प्यांनुसार जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करणे बंधनकारक.
4. अभिसरण (Convergence)
- मनरेगा अंतर्गत 90 दिवसांचे मजुरी सहाय्य.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी ₹12,000. |
|
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
- महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे आवश्यक.
- लाभार्थी बेघर किंवा कच्च्या घरात राहणारा असावा.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: ₹१.२० लाख (ग्रामीण क्षेत्रासाठी).
- स्वतःची किमान २६९ चौ. फूट जागा असावी किंवा विद्यमान कच्च्या घराच्या जागेवर बांधकाम करता येईल.
- शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थ्याकडे स्वत:चे किंवा कुटूंबीयाचे पक्के घर नसावे
- लाभार्थी निवड ग्रामसभेमार्फत करण्यात येईल.
- लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL)मध्ये समाविष्ट नसावा.
|
|
| f. योजनेची येशोगाथा.
|
|
|
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक |
https://pmayg.dord.gov.in |
|