जिल्हा परिषद उपकर योजना प्रसिद्धी व प्रचार योजना 

विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग

योजनेचे नाव- जिल्हा परिषद उपकर योजना प्रसिद्धी व प्रचार योजना

विषय माहिती शेरा
a.   योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

जिल्हा परिषद उपकर योजना प्रसिद्धी व प्रचार कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय दोन दिवसीय माहिती,शिक्षण व जनसंपर्क शिबिराचे आयोजन करणे.
b.     योजनेचे उद्दीष्ट.

 

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती, पशुपक्षी व्यवसायाची माहिती, पशुसंवर्धन विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,  इनाफ विषयी माहिती, कृत्रिम रेतन कार्यक्रम, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम, पशुसंवर्धन विषयक विविध योजनांची दिनदर्शिका.घडी पत्रिका वाटप,कृत्रिम रेतन कार्यक्रम व राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम इ. अंतर्गत जनजागृती, जनावरांच्या कानात बिल्ला मारणे, कृत्रिम रेतन करणे तसेच पायालाग, बुरसेल्योसिस, घटसर्प, फ.या. पी.पी.आर. आदी आजारावर, कोबड्यांच्या देवी कोंबड्यांचा मानमोडी या रोगावर लसीकरण करणे, तसेच विविध योजनांचे, कार्यमोहिमांचे बॅनर छपाई करणे.प्रशिक्षण घेणे
c.   योजनेचे निकष.

 

प्रचार व प्रसिद्धी करीता दोन दिवसांचे तालुकास्तरीय माहिती, शिक्षण व जनसंपर्क (माशिज) शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शिबिराचे स्थळ, दिनांक याची निश्चिती प्रशासन सभापती, पंचायत समिती यांच्या मान्यतेने करावी. शिबिरात दररोज किमान 200 पशुपालकांची उपस्थिती अनिवार्य राहील. प्रती माशिज शिबिर रु. 60,000/- खर्च खालील नमुद (अ) ते (क) या बाबींवर करण्यात यावा. (अ) कार्यक्रम पत्रिका छपाई करणे. (ब) मंडप भाडे खर्च, बैठक व्यवस्था करणेसाठी येणारा भाडे खर्च, ध्वनीक्षेपक भाडे खर्च, प्रशिक्षण साहित्य खरेदी करणे व अनुषंगिक खर्च. (क) पशुपालकांना चहा, पाणी, अल्पोपहार व दुपारचे एक वेळचे जेवणे देणेसाठी येणारा खर्च.कार्यक्रम पत्रिकेत शिबिराचे विविध विषयावर वक्ते, वेळ इ. माहिती नमूद करावी. तालुक्यातील व अन्य तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय महाविद्यालय विषयतज्ञ, बँकेचे प्रतिनिधी, विविध महामंडळाचे प्रतिनिधी, उद्योग केंद्र प्रतिनिधी यांना प्रशिक्षण घेणेसाठी आमंत्रित करावे.
d.  योजनेचे कार्यपध्दती.

 

तालुक्यात दोन दिवसांचे माहिती शिक्षण व जनसंपर्क शिबिर आयोजित करावे. शिबिराच्या स्थळ व दिनांकाची निश्चिती पंचायत समितीच्या प्रशासन सभापतींच्या मान्यतेने करावी. शिबिरात दररोज किमान 200 पशुपालकांना सहभागी करून घ्यावे. शिबिरात दुधाळ नवजात वासराचे व्यवस्थापन, कालवडीचे/गायीचे व्यवस्थापन, गाभण जनावरांचे व्यवस्थापन, प्रजननपूर्व व प्रजननोत्तर जनावरांचे व्यवस्थापन, भाकड जनावरांचे व्यवस्थापन, शेळी व्यवस्थापन, कुक्कुट व्यवस्थापन, चारा लागवड व्यवस्थापन, पशुपक्षांचे आजार व आजारांचे नियंत्रण, पशुखाद्यांचे खाद्य व्यवस्थापन, स्वच्छ दुध निर्मिती, पशुधन विमा, पशुसंवर्धन खात्याच्या विविध योजना, जनावरे मोकाट सोडल्याने होणारे दुष्परिणाम, कृत्रिम रेतन, गटशेती करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, मुरघास तयार करणे, सुक्या भाताच्या पेंढ्यावर युरिया प्रक्रिया करणे, पशुसंवर्धन विषयक नविन तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती देण्यात यावी. शिबिरात पशुपालकांचे प्रश्न समजून घ्यावेत व त्यांना उपाय योजना सांगावी.
e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. सर्व प्रवर्गासाठी सदरची प्रशिक्षण योजना लागू असून वय मर्यादा 18-65 वर्षे अशी आहे.
f. योजनेची येशोगाथा.

 

सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तलासरी तालुक्यातील एकूण 200पशुपालकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून प्रमाणपत्र देणेतआले आहे व प्रशिक्षांर्थी समाधानी आहेत.
g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक सदर प्रशिक्षण तारीख इच्छुकांना नोटीस बोर्ड, दूरध्वनी/ whatsup द्वारे कळविण्यात येते